डिग्रस सरपंचपदी बावाचकर तर उपसरपंच प्रमोद पाटील यांची निवड


 डिग्रस सरपंचपदी बावाचकर तर उपसरपंच पदी प्रमोद पाटील यांची निवड :

      डिग्रस वार्ताहार :

      मागील सहा महिन्यापासून दिग्रस तालुका उदगीर येथील सरपंचाचे रिक्त असलेले पदावर दिनांक 29 .12 .2020 रोजी सरपंच म्हणून लक्ष्मण गोपाळ बावाचकर तर उपसरपंच म्हणून प्रमोद पाटील यांची एक मताने सदस्य तुन निवड उदगीरचे नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली .

        सन 2017 -18 च्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक ही लोकांमधून सरपंचाची निवड करण्यात येत होते . म्हणून तत्कालीन सरपंच पदाचे आरक्षण हे ओबीसीला सुटले होते . म्हणून उपसरपंच प्रमोद पाटील व चेअरमन कुमार पाटील यांच्या पॅनलचे उमेदवार श्रीकांत कोपले हे जनतेतून भारी मताने निवडून आले होते . परंतु त्यांनी कर्तव्यावर असताना आर्थिक गैरव्यवहार केला .असे त्यांच्यावर आरोप झाले व प्रकरण मा .उच्च न्यायालयापर्यंत गेले असता माननीय न्यायालयाने त्यांना अपात्र घोषित केल्यामुळे सरपंचाचे पद रिक्त होऊन उपसरपंच प्रमोद पाटील यांनी पुढे सहा महिने सरपंच पदाचा पदभार सांभाळला .नंतर त्यांची ही मुदत संपल्यामुळे व निवडून आलेल्या सभासदातून सर्वानुमते सरपंचाची निवडीचे आदेश शासनाने दिल्यामुळे दिग्रस चे ओबीसीचे  सदस्य लक्ष्मण  बावाच कर यांना सरपंच म्हणून सदस्याने एकमताने निवड केली आहे .या निवडीला ग्रामसेवक जानताने , तलाठी अनुराधा आनगले मॅडम तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गायकवाड , मारुती डोंबाळे .अहिल्या माने . जयश्री ढगे व गावातील प्रतिष्ठित विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शिरीष कुमार पाटील ,रामेश्वर ढगे , विजयकुमार माने ,बालाजी ईटेवाढ इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते या निवडी बाबत अनेक राजकीय, सामाजीक व्याक्ती कडून अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे